पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

DhoniKeepTheGlove : ग्लोव्हजसाठी बीसीसीआयनं आयसीसीकडे मागितली परवानगी

विनोद राय

विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या  ग्लोव्ह्जवर आयसीसीनं आक्षेप  घेतला होता. तर दुसरीकडे भारतीय चाहत्यांनी मात्र ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज परिधान करणाऱ्या धोनीला पाठिंबा दिला आहे. यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रशासक विनोद राय यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

धोनीला ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज परिधान करण्यास द्यावे  यासंदर्भात आयसीसीकडे आम्ही परवानगी मागितली आहे, प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ असं बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय म्हणाले. 

आयसीसीच्या नियमावलीनुसार, सामन्यादरम्यान राजकीय, धार्मिक किंवा अन्य संदेश प्रदर्शित करण्याची परवानगी नाही. त्यामुळेच धोनीने 'बलिदान चिन्ह' असलेले ग्लोव्ह्ज सामन्यादरम्यान वापरू नये, असे आयसीसीने म्हटले  होते.  आयसीसीच्या  विनंतीनंतर भारतीय चाहते नाराज झाले. त्यांनी धोनीला पाठिंबा दिला आहे. बलिदान चिन्ह असलेल्या ग्लोव्हजवर आक्षेप घेण्याचं कारण  काय ही अभिमानाची बाब आहे असं भारतीय चाहत्यांनी म्हटलं आहे.

अभिनेता रितेश देशमुखसह लाखो क्रिकेट चाहत्यांनी धोनीला पाठिंबा दिला आहे यावर आयसीसी काय निर्णय घेते हे पाहण्यासारखं ठरेन. 
भारतीय लष्कराने २०११ मध्ये  महेंद्रसिंह धोनीला  लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल केली होती.  यावेळी धोनीने पॅरा ब्रिगेडच्या अंतर्गत प्रशिक्षणही घेतलं होते. धोनी भारतीय सैनाच्या १०६ पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनी हे विशेष बलिदान चिन्ह असलेलं ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला होता.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC to seek permission for MS Dhoni to wear Balidaan insignia on his gloves Committee of Administrators Vinod Rai