पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीचा मोठा निर्णय

संग्रहित छायाचित्र

ICC Women World Cup Under-19: महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयसीसीने एक मोठे पाऊल उचलले आहे. २०२१ पासून १९ वर्षाखालील महिला क्रिकेट विश्व चषकाच्या आयोजनाला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाची दुबई येथे सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अनेक नव्या स्पर्धा घेण्याबाबतच्या प्रस्तावावरही निर्णय घेण्यात आले.   

नेपाळ-झिम्बाब्वेला पुन्हा आयसीसीचे सदस्यत्व

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक हा दोन वर्षांच्या अंतराने खेळवण्यात येईल. याशिवाय १९ वर्षांखालील महिला आणि पुरुष गटात चार मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. १९ वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या यजमानपदाचा पहिला मान हा बांगलादेशला मिळाला आहे.  

'अभिनंदन दादा.... देर है अंधेर नहीं! सेहवागचा शुभेच्छा स्ट्रोक

आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले की, अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष गटात प्रत्येक वर्षी एक मोठी स्पर्धा खेळवण्याचा विचार झाला. यात द्विपक्षीय मालिकेसह काही मोठ्या स्पर्धा खेळवण्यात येतील. भविष्याच्या दृष्टिने हे महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही शशांक मनोहर यांनी व्यक्त केला.