पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC Test Ranking: दि्वशतकाच्या जोरावर विराट 'नंबर वन'च्या खुर्चीजवळ

विराट कोहली

भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात झाला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाबाद २५४ धावांची खेळी करत तो सामनावीराचा मानकरी ठरला. विराटच्या या खेळीचा कसोटी मानांकनालाही फायदा मिळाला. या खेळीनंतर विराटला ३७ रेटिंग पॉईंट्सचा फायदा मिळाला. त्याच्यात आणि क्रमांक एकवर असलेला स्टिव्ह स्मिथ दरम्यान आता फक्त एका पाँईंट्सचे अंतर आहे. अ‍ॅशेज मालिकेतील जबरदस्त कामगिरीनंतर स्मिथने विराटला कसोटी रँकिंगमध्ये मागे टाकले होते.

WTC Point Table: 'विराट' विजयासह भारतीय संघाचे द्विशतक!

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान १९ ऑक्टोबरपासून रांची येथे मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विराटने चांगली कामगिरी केल्यास तो फलंदाजांच्या कसोटी रँकिंगमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल. 

पुणे कसोटीपूर्वी विराटच्या खात्यात ८९९ रेटिग पाँईंट होते. २०१८ नंतर ही पहिलीच वेळ होती, जेव्हा विराट ९०० रेटिंग पॉईंटच्या खाली आला होता. पण तो पुन्हा एकदा नंबर एकच्या खुर्चीवर पोहोचला. अजिंक्य रहाणेने पुणे कसोटीत अर्धशतक ठोकले होते. त्यामुळे तो टॉप-१० फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. रहाणे सध्या ९ व्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात ७२१ रेटिंग पॉईंट आहेत.

या झेलसाठी तर साहाला पार्टी द्यावी लागणार : उमेश यादव

मयंक अग्रवाललाही शतकाचा फायदा झाला आणि तो करिअरच्या सर्वोत्तम रँकिंगवर आहेत. मयंकच्या खात्यावर ६५७ रेटिंग पाँईंट्स आहेत. तो सध्या १७ व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी तो २५ व्या स्थानी पोहोचला होता. तर रोहित शर्मा १७ व्या क्रमांकावरुन २२ व्या स्थानी घसरला आहे. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांबाबत बोलायचे म्हटले तर क्विंटन डिकॉक १० व्या क्रमांकावर घसरला आहे. तर त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिस किरकोळी उडी घेत ११ व्या स्थानी आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC test ranking with not out double century virat kohli got 37 rating points in icc test batsmen ranking