पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC Test Rankings: बुमराहची सर्वोच्च कामगिरी, विराट अव्वलस्थानी कायम

जसप्रीत बुमराह टॉप टेनमध्ये कोहली अव्वलस्थानी कायम

अँटिग्वा कसोटीमधील भेदक कामगिरीच्या जोरावर जसप्रीत बुमराहने पहिल्यांदाच आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दहामध्ये स्थान पक्के केले. अँटिग्वाच्या मैदानात झालेल्या विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने ५ बळी मिळवण्याचा पराक्रम केला होता. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने चारवेळा कसोटी सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवले आहेत. 

Test Championship Point Table: टीम इंडिया अव्वलस्थानी

अजिंक्य रहाणेची दमदार फलंदाजी आणि बुमराहाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीमध्ये विजयी सलामी दिली. विंडीज विरुद्धच्या कामगिरीनंतर बुमराहच्या नावे ७७४ गुण जमा झाले असून १६ व्या स्थानावरुन थेट ७ व्या स्थानावर पोहचला आहे. दुसरीकडे फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे एका स्थानात सुधारणा करुन १० व्या स्थानावर पोहचला. रहाणेनं अँटिग्वाच्या मैदानात कसोटी कारकिर्दीतील दहावे शतक झळकावले होते. 

फिरोजशहा कोटला स्टेडियम आता जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंन्स ९०८ गुणासह अव्वलस्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज कसिगो रबाडा (८५१) तर इंग्डंचा जेम्स अँडरसन (८१४) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टने अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे. फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यम्सन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.