विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात शून्यावर बाद झालेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रमवारीतील आपले अव्वलस्थान गमावले आहे. अॅशेस मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने त्याच्या जागेवर कब्जा केला आहे. एका वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात नेहमीच तुलना होत असते.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया अव्वलस्थानी
ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथने दोन कसोटी सामन्यात दमदार खेळ दाखवला होता. या कामगिरीच्या जोरावर त्याने विराटला अवघ्या एका गुणाने मागे टाकले. स्मिथच्या खात्यात सध्याच्या घडीला ९०४ रेटिंग पॉइंट्स जमा झाले आहेत. विराट कोहली ९०३ रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. अॅशेस मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात बहरदार कामगिरी करुन अव्वलस्थान अधिक मजबूत करण्याची स्मिथकडे संधी आहे.
It didn't take @stevesmith49 too long to find his way back to No.1 on the @MRFWorldwide ICC Test batting rankings!@ajinkyarahane88 has made some significant strides too 👏 pic.twitter.com/UJ7aezeosR
— ICC (@ICC) September 3, 2019
वेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार!
या दोघांशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८७८ रेटिंग पॉइंट्सह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा मध्यफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा विंडीजविरुद्धच्या सामन्यात फारशी प्रभावी कामगिरी करु शकला नव्हता. मात्र ८२५ रेटिंग पॉइंट्सह तो चौथ्या स्थानावर आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं विंडीज विरुद्ध चांगली कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तो ७२५ रेटिंग पॉइंट्स मिळवून सातव्या स्थानावर पोहचला आहे.