पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-२० विश्वचषक स्पर्धेसंदर्भात आयसीसीकडून स्पष्टीकरण

आयसीसी वर्ल्ड कप

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानात भारतातील लोकप्रिय अशी आयपीएल स्पर्धेवर संकटाचे सावट आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसंदर्भात संभ्रमाचे वातावरण असताना आयसीसीने यावर भाष्य केले आहे. विश्वचषक स्पर्धेसंदर्भात निर्णय घेताना आम्ही कोणत्याही प्रकारची घाई गडबड करणार नाही, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. 

Video: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात

ऑस्ट्रेलियात १८ आक्टोबर ते १५ नोव्हेबर दरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धा नियोजित आहे. कोरोना विषाणून जगभरात घातलेल्या थैमानामुळे स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग निर्माण झाले आहेत. आयसीसीच्या प्रवक्त्याने 'स्कायस्पोर्ट'दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक स्पर्धेच्या तयारी सुरुच आहे. सध्याची परिस्थिती पाहता व्यापकदृष्ट्या आपतकालीन योजनेवरही विचार केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. स्पर्धेसाठी अजून सहा महिन्याचा कालावधी आहे.

कोरोना लक्षणाची खात्री करण्यासाठी राज्यात कोविड हेल्पलाईन सुरू

परिस्थितीनुसार विश्वचषक स्पर्धा खेळवण्यासंदर्भात ऑस्ट्रेलियन सरकारसोबतच इतर सदस्य देशातील क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करुन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. निर्णयासंदर्भात कोणतीही घाई गडबड करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.  विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल किंवा प्रेक्षकांशिवायच ही स्पर्धा पार पडेल, अशी चर्चा देखील रंगताना दिसत आहे. आयसीसीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्तास या चर्चाला पूर्ण विराम मिळाला असून आयसीसीकडून योग्य वेळी काय निर्णय घेण्यात येणार याची प्रतिक्षा करावी लागेल.