पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC T20I Batting Rankings: विराट टॉप-10 मध्ये, रोहितची घसरण

विराट कोहली

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात विंडीजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताने निर्विवाद वर्चस्व मिळवले. या सामन्यासह भारताने विंडीजविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी खिशात घातली. प्रथम फलंदाजीसाठी मैदान उतरलेल्या भारतीय संघातील सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत विंडीज गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले. 

सचिन विराट नव्हे दीपिकाला आवडतो हा क्रिकेटर

या मालिकेतील दमदरा कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. विराट कोहलीने हैदराबादच्या सामन्यात नाबाद ९४ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या टी-२० सामन्यात तो १९ धावा करुन माघारी फिरला होता. तिसऱ्या सामन्यात कोहलीने आणखी एक अर्धशतक आपल्या खात्यात जमा करत नाबाद ७० धावांची खेळी केली. मालिकेतील दोन अर्धशतकाच्या जोरावर ६८५ रेटिंगसह कोहली १० व्या स्थानावर पोहचला आहे. 

हिटमॅन रोहितनं कॉट्रेलला षटकार खेचत रचला अनोखा विक्रम

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानाचा बाबर आझमचा दबदबा आहे. तो ८७९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियन फिंच (८१०) आणि इंग्लंडचा डेव्हिड मिलन (७८२) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. लोकेश राहुलने तीन स्थानांनी सुधारणा करत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे सलामीवीर रोहित शर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने ७१ धावांची दमदार खेळी केली होती. मात्र पहिल्या दोन सामन्यात तो ८ आणि १५ धावांवर बाद झाला होता. दोन सामन्यातील सुमार कामगिरीमुळे रोहितची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc t20i batting ranking icc t20 batsmen ranking virat kohli back in top 10 kl rahul rohit sharma in top 10 batsmen after india vs west indies t20 series ind vs wi