पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC T20 Rankings : रोहित शर्मा 'टॉप टेन'मध्ये, धवन कोहली उंबरठ्यावर

रोहित शर्मा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत रोहित शर्माने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. याशिवाय सलामीवीर शिखर धवन टॉप टेनच्या समीप आला आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यानंतर आयसीसीच्या टी २० क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ११ व्या स्थानावर आहे. 

सायनाने अर्ध्यावर सामना सोडला, सिंधूचाही खेळ खल्लास!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात कोहलीने ७२ धावांची नाबाद खेळी केली होती. सलामीवीर शिखर धवन आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतीली ४० आणि ३६ धावांच्या खेळीनंतर १३ व्या स्थानावर पोहचला आहे. रोहित ६६४ गुणांसह इंग्लंडच्या एलेक्स हेल्ससोबत संयुक्तपणे आठव्या स्थानावर आहे.

रोहितसाठी नेतृत्व करत कर्तृत्व दाखवण्याची 'कसोटी'

गोलंदाजीमध्ये वाशिंग्टन सुंदर आठ स्थानांनी सुधारणा करत ५० व्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात नाबाद ७९ धावांची खेळी करुन मालिका बरोबरीत सोडवणारी खेळी करणारा आफ्रिकेचा कर्णधाराने ४९ व्या स्थानावरुन ३० स्थानावर झेप घेतली आहे.