पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-२० विश्वचषकातला 'हिरो' जोगिंदर कोरोनाविरोधातील लढाईत ठरतोय 'जगाचा हिरो'

जोगिंदर शर्मा

टीम इंडियाला २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी करून विजय मिळवून देणारा जोगिंदर शर्मा हा प्रत्येकाला ठावूक असेल.  क्रिकेटमधील करिअरनंतर जोगिंदर आता हरियाणा पोलिस दलात डीएसपी पदावर  कार्यरत आहे. क्रिकेटच्या मैदानात शत्रूला जेरीस आणलेला जोगिंदर आता कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी लढाईच्या मैदानात उतरला आहे.

मोदींनी फोनवरुन थेट नायडू रुग्णालयातील नर्सशी साधला संवाद, अन्...

देश सुरक्षित ठेवण्यासाठी जोगिंदर अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत आहे. आयसीसीनं जोगिंदरचा फोटो  शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षांवर केला आहे. २००७ मधल्या टी २० वर्ल्डकपमधला हिरो आता २०२० सालच्या कोरोनाविरोधातील लढाईत जगाचा खरा हिरो  ठरला आहे, असं लिहित त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी जोगींदरनं एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तो लोकांना घरी जाण्याचे आवाहन करताना दिसत आहे. स्वत:चा बचाव हाच करोना व्हायरसविरुद्ध आपल्याला वाचवू शकतो. याच्याविरुद्ध आपल्याला एकत्र लढावे लागले. घरी राहून तुम्ही आमची मदत करा, असे हे फोटो शेअर करताना जोगिंदरने म्हटले होते.

कोरोनाशी लढा: टाटा ट्रस्टकडून तब्बल ५०० कोटींची मदत

जोगिंदरबरोबरच क्रीडा विश्वातून सचिन तेंडुलकरपासून  ते सुरेश रैना पर्यंत सर्वंच क्रिकेटरनं कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारला आर्थिक मदत आहे.