पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#ICCRules : चेतन भगत यांनी केला आयसीसीच्या नियमाचा 'विनोद'

सुपर ओव्हरमध्ये सामना बरोबरीत आणल्यानंतरही न्यूझीलंडला पराभव स्वीकारावा लागला

लॉर्डसच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करुन संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या बेन स्टोक्सला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. फायनलनंतर सध्या ट्विटरवर  #ICCRules  (आयसीसी नियम हॅशटॅग) चांगलाच ट्रेंड करत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील बरोबरीत सुटलेला सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघाच्या धावसंख्येत पुन्हा बरोबरी झाल्याने सर्वाधिक बाउंड्री नावावर असलेल्या इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आले. 

आयसीसीच्या या नियमामुळे सर्वांनाच अचलंबित केले आहे. ट्विटरवर आयसीसीला काही नेटकरी ट्रोल देखील करत आहेत. अल्पावधीत तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले लेखक चेतन भगत यांनी ट्विटरच्या माध्यमातून इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील निकालाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या नियमावर एक विनोद शेअर केला आहे. 
"शिक्षक म्हणतो की, इंग्लंडचं अव्वल आहे. यावर न्यूझीलंडची भावना मलाही तेवढेच मार्क आहेत. मग मी का नाही? यावर शिक्षक इंग्लंडने चार गुणाचा प्रश्न सोडवला आणि तुम्ही दोन गुणाचा प्रश्न सोडवला पाहा असे उत्तर देतो. यावर न्यूझीलंडला आयसीसीचा नियम काय आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे." अशा आशयाचे ट्विट चेतन भगत यांनी केले आहे. या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून अनेक लोक रिट्विट देखील करत आहेत. 

अनेकजण आयसीसीच्या या नियमामुळे न्यूझीलंडवर अन्याय झाल्याची भावनाही व्यक्त करत आहेत. आयसीसीने आपल्या या नियमावर काम करण्याची गरज असल्याच्या भावनाही नेटकऱ्यांरकडून व्यक्त होत आहेत. निकालानंतर विल्यम्सनने पंचाशी कोणताही वाद न घालता नियमाचे पालन केल्याचा दाखला देत काहीजण विल्यम्सनच्या नेतृत्वाचे कौतुकही करत आहेत. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc rules thats how people crticizing the rule used after super over in england vs new zealand match