पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC Ranking : भारताचा कसोटीतील रुबाब कायम!

कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचे अव्वलस्थान कायम

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीतील आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (ICC) ने गुरुवारी वार्षिक क्रमवारी अद्ययावत केली. २०१५-१६ या वर्षात संघानी केलेली कामगिरी वगळून नव्याने अद्ययावत केलेल्या क्रमवारीत २०१६-१७ आणि २०१७-१८ मधील कामगिरीतील ५० टक्के गुणांचाच विचार आयसीसीने केला आहे.   

इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकापूर्वी इंग्लंडने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील  अव्वलस्थान कायम राखले आहे. पण विश्वचषकात याच तोऱ्यात जायच असेल तर त्यांना विश्वचषकापूर्वी आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध होणाऱ्या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. 

कसोटी क्रमवारीत न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या क्रमवारीत त्यांना थोडाफार फायदा झाला आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात आता केवळ २ गुणांचे अंतर आहे. यापूर्वी भारत ११६ गुणासह तर न्यूझीलंड १०८ गुणासह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ०-२ अशा फरकाने गमावलेली कसोटी मालिका आणि श्रीलंकेविरुद्ध २-१ या फरकाने जिंकलेली मालिका २०१५-१६ सत्रातील असल्याने भारताला ३ गुण गमवावे लागले. तर दुसरीकडे याच सत्रात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासोबत २-० ने गमावलेली मालिका वगळण्यात आल्याने न्यूझीलंडला ३ गुणांचा फायदा झाला आहे.