पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रमी कामगिरीसह चाहरची क्रमवारीत गरुड झेप!

दिपक चाहर

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका संपलेली आहे. या मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २-१ अशा फरकाने बांगलादेशला पराभूत केले. या मालिकेत भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चाहरने अखेरच्या सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. अखेरच्या सामन्यातील सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कार देखील त्याने पटकावला. 

मेस्सीचा हॅटट्रिकचा पराक्रम, रोनाल्डोच्या विक्रमाशी बरोबरी

नागपूरच्या मैदानात रंगलेल्या अखेरच्या सामन्यात चाहरने विश्वविक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत त्याने अव्वलस्थान पटकावले आहे. या कामगिरीसह चाहरने आयसीसी टी-२० च्या क्रमवारीतही गरुड झेप घेतली आहे. आपल्या क्रमवारीत ८८ स्थानांनी सुधारणा करत दीपक चाहर ४२ व्या स्थानावर पोहचला आहे. 

परदेशात फरार झालेला 'मॅच फिक्सर' पोलिसांच्या जाळ्यात

बांगलादेश विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक केली. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये हॅटट्रिकचा पराक्रम करणारा दिपक चाहर भारताचा पहिला गोलंदाज ठरला.