पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या चाहत्यांना ICC ने दिला हा पर्याय

क्रिकेट चाहत्यांसाठी आयसीसीने घेतला फ्लॅशबॅकचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाच्या मैदानात शुकशुकाटाचे वातावरण आहे. कोरोनाविरोधातील सामना जिंकण्यासाठी गर्दी टाळून घरात थांबण्याचा सल्ला सरकार आणि प्रशासनाकडून देण्यात आला आहे. खेळाडू आणि खेळ संघटना देखील या नियमाचे पालन करताना दिसतात. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आयसीसीने जून्या सामन्यांचा संग्रह क्रिकेट चाहत्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवडचे तिघे कोरोनामुक्त; टाळ्या वाजवत दिला डिस्चार्ज

आयसीसीने 1975 पासून ते आतापर्यंत झालेल्या महिला-पुरुष विश्व चषषकातील सामन्यांचा यात समावेश असणार आहे. भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्या विश्वचषक विजयाची झलकही आपल्याला पाहता येणार आहे  

आयसीसी मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी म्हणाले की, 'खेळ समहूचा घटक म्हणून हा काळ आमच्यासाठी अभूतपूर्व असा आहे. यापरिस्थितीत क्रीडा प्रेमींच्या सोबत असणे देखी गरजेचे आहे. सध्याच्या घडीला कोणत्याच ठिकाणी क्रिकेट खेळले जात नाहीत. त्यामुळे आम्ही जून्या सामन्याचे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

देशांतर्गत विमान वाहतुकीवरील बंदीत आणखी वाढ

आयसीसी फेसबुक पेजवर 'वॉच पार्टीज', आयसीसी सोशल मीडिया चॅनेल, आयसीसी वेबसाइट आणि मोबाइल एपच्या माध्यमातून जून्या सामन्यांचा आनंद घेता येईल, अशी माहितीही मनू साहनी यांनी दिली.