पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC World Cup: जाणून घ्या पुढचा विश्वचषक कधी, कुठे खेळवला जाणार

ICC World Cup: जाणून घ्या पुढचा विश्वचषक कधी, कुठे खेळवला जाणार

ICC World Cup 2019: आयसीसी विश्वचषक २०१९ चा प्रवास आता संपुष्टात आला आहे. इंग्लंडने रविवारी लॉर्ड्सवर झालेला सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचून न्यूझीलंडला पराभूत करत विश्वचषक आपल्या नावे केला. आता चार वर्षांनंतर म्हणजेच २०२३ मध्ये पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले जाईल. यावेळी भारतात विश्वचषक स्पर्धा खेळली जाईल.

आयसीसी विश्वचषक २०२३ भारतात ९ फेब्रुवारी ते २६ मार्च पर्यंत खेळवला जाईल. हा १३ वा एकदिवसीय विश्वचषक असेल. इंग्लंडने याआधीच १९८७, १९८३, १९९९ आणि २०१९ मध्ये विश्वचषकाचे आयोजन केलेले आहे. इंग्लंड एकमेव असा देश आहे, ज्यांनी १९७५, १९७९, १९८३, १९९९ मध्ये आर्यलंड, नेदरलंड, स्कॉटलंड आणि वेल्ससह यजमानपद भुषवले आहे.

सचिन तेंडुलकरच्या 'वर्ल्ड कपXI'मध्ये धोनी नाही

१९८७ मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा इंग्लंडहून दूर भारत आणि पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती. या खंडात १९९६ आणि २०११ मध्येही विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. २०११ मध्ये भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली १९८३ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता.

दरम्यान, २००९ मध्ये लाहोरला श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान बसवर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर सर्व देशांनी पाकिस्तानला जाऊन खेळण्यास नकार दिला होता. अजूनही अनेक देशांचा पाकिस्तानला जाण्यास 'ना' आहे.

CWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी