पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'टॉपर' कोहलीला हिटमॅन रोहित देतोय 'फाइट'

रोहित शर्मा आणि विराट कोहली

विश्वचषकातील विक्रमी पाच शतकासह हिटमॅन रोहित शर्माने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहलीच्या खूपच जवळ पोहचला आहे. एकदिवसीय फलंदाजीमध्ये कोहली अव्वल असून रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांमध्ये यापूर्वी ५१ गुणांचा फरक होता. पण विश्वचषकातील दमदार कामगिरीमुळे रोहितने कोहली यांच्यातील अंतर आता केवळ ६ गुणांचे आहे. 

U19 WC : त्यावेळी विराटचं नेतृत्व ठरलं होतं विल्यम्सनपेक्षाही भारी

यंदाच्या विश्वचषकात कोहलीने ६३.१४ च्या सरासरीनं ४४२ धावा करत ८९१ रेटिंग अंक मिळवले आहेत. उपांत्य सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नावे ८८५ अंक आहेत. ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नरला देखील विश्वचषकातील कामगिरीचा चांगलाच फायदा झाला आहे. ६३८ गुणांसह तो सहाव्या स्थानावर पोहचला आहे. एक वर्षांच्या बंदीनंतर मैदानात उतरल्यानंतर पहिल्या दहात स्थान मिळवून त्याने सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडले आहे. 

ICC WC 2019: टीम इंडियाच्या सुरक्षेसंदर्भात BCCI चे ICC ला पत्र

गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह अव्वलस्थानी कायम असून अष्टपैलु खेळाडूंच्या यादीत शाकिबने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार, इंग्लंड १२३ गुणांसह अव्वल असून दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघ आणि इंग्लंडमध्ये केवळ दशअंशस्वरुपात अंतर उरले आहे. न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया ११२ अंकासह अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या तर दक्षिण आफ्रिका ११० अंकासह पाचव्या स्थानावर आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc odi rankings rohit sharma is in tough fight with virat kohli to retain top spot jasprit bumrah remains top odi bowler