आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. विश्वचषकातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीमध्ये बुमराह अव्वलस्थानी आहे.
लॉर्डसच्या मैदानातील इंग्लंड-न्यूझीलंड यांच्या सामन्यातील कामगिरीचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडू फायद्यात आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन ७९६ रेटिंगसह रॉस टेलरनंतर सहाव्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जेसन रॉय ७७४ रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे.
#EngvsNz Final 'वर्ल्ड कपचे विजेतेपद संयुक्तरित्या द्यायला हवे होते'
भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर फलंदाजांच्या यादीत २४ स्थानांनी भरारी घेतली आहे. तो या यादीत १०८ व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी अनुक्रमे २९ आणि ३२ व्या स्थानावर आहेत.
टीम इंडियासाठी BCCI ला हवा असा कोच!
गोलंदाजीच्या यादीत इंग्लंडच्या क्रिस वोक्सने कारकिर्दीतील सर्वश्रेष्ट ६७६ रेटिंग मिळवत सातव्या स्थानावर पोहचला आहे. दुसरीकडे स्पर्धेत २० बळी मिळवणारा इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरने पहिल्या ३० गोलंदाजामध्ये स्थान मिळवले आहे.