पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड -१९: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा स्थगित

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डिकॉक (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूमुळे क्रीडा जगतावरही मोठे संकट कोसळले आहे. अनेक आयोजकांवर नियोजित स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. भारतापेक्षा श्रीलंकेतील कोरोनाची परिस्थिीती सुधारेल, असा दावा करत आयपीएलच्या मेजवाणीची तयारी दर्शवणाऱ्या श्रीलंकेतील नियोजित स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंका दौरा करणार होता. या दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार होते. मात्र श्रीलंका आणि  दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने संगनमताने दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय.

पिकलेल्या दाढीवरुन पीटरसननं विराटला केलं ट्रोल

दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने आयसीसी वनडे लीगमध्ये सहभागी होणार होता. सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक्स फॉलल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यपरिस्थिती लक्षात घेऊन नाइलाजास्तव हा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ही मालिका खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. हा दौरा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होता. कारण तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून आम्ही आयसीसीच्या नव्या वनडे लीगचा घटक होणार होता. याशिवाय आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिने टी-20 मालिका महत्त्वपूर्ण ठरली असती, असेही त्यांनी म्हटले आहे. 

स्वतःचे केस कापत असल्याचा सचिन तेंडुलकरचा फोटो चर्चेत!

कोरोना विषाणूमुळे भारतातील क्रिकेटमधील लोकप्रिय आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल स्पर्धेवर घोंगावणाऱ्या संकटावर स्पर्धेच्या नियोजनासाठी श्रीलंकन बोर्ड सहकार्य करेल, असे श्रीलंकन बोर्डाचे अध्यक्ष सिल्वा यांनी म्हटले होते. मात्र बीसीसीआयने यासंदर्भात श्रीलंकन बोर्डासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच श्रीलंकेत आयपीएलसंदर्भात कोणताही विचार सद्यपरिस्थितीत होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC ODI league South Africa s June tour of Sri Lanka postponed due to coronavirus covid-19 crisis