पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-20 : भारत-पाक सामना खेळवण्यासाठी ICC उत्सुक, पण...

भारत-पाक यांच्यात सराव सामना खेळवण्यास आयसीसी उत्सुक

ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची उत्सुकता वाढवण्यासाठी स्पर्धेपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळवण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (आयसीसी) प्रयत्नशील आहे. विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी या दोन्ही संघामध्ये सराव सामना खेळवावा, याबाबत आयसीसी विचार करत आहे. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र १८ ऑक्टोबर २०२० पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असल्याचे पक्के झाले आहे.  

ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यावर मितालीचा शाब्दिक मारा

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयसीसीची नियंत्रण समिती (गव्हर्निंग बॉडी) याला संमती आहे. मात्र यांसदर्भात आयसीसीने भारतीय क्रिकेट मंडळाकडे कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावर पाहता बीसीसीआय याला संमती देण्याची शक्यता धूसरच आहे.  २००८ मध्ये मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील द्विपक्षीय संबंधाला पूर्णविराम लागला आहे. तेव्हापासून आयसीसीच्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ एकमेकांसोबत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक सामन्यापूर्वी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध खेळावे किंवा नाही याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकला धूळ चारत विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धची विजयी कामगिरीचा आलेख उंचावला होता.   

फिफा वर्ल्ड कप पात्रता : अखेरच्या क्षणी भारताचा पराभव टळला, पण...

उल्लेखनिय आहे की, २०१२-१३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेरची द्विपक्षीय मालिका भारतामध्ये खेळवण्यात आली होती. पाकिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली होती. त्यानंतर भारत-पाक यांच्यात चॅम्पियन चषक (२०१३), टी-२० वर्ल्ड कप (२०१४), वर्ल्ड कप (२०१५), टी-२० वर्ल्ड कप (२०१६), चॅम्पियन चषक (२०१७) मध्ये लढत झाल्याचे पाहायला मिळाले होते.