इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघावर अन्याय झाल्याचा सूर निकालानंतर उमटत आहे. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघ तुल्यबळ ठरल्यानंतर चेंडू अधिकवेळा सीमापार करणाऱ्या इंग्लंडला विश्वविजेताचा मान मिळाला. आयसीसीचा बाऊंडीरच्या निकशावरील नियम न्यूझीलंडच्या संघावर अन्याय करणारा आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असताना ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध माजी पंच सायमन टॉफेल यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.
#ICCRules : चेतन भगत यांनी केला आयसीसीच्या नियमाचा 'विनोद'
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामन्यातील अखेरच्या षटकात धावांचा पाठलाग करताना ओव्हर थ्रोच्या रुपात मिळालेल्या ६ धावातील एक धाव चुकीच्या पद्धतीने दिली गेली, असे मत टॉफेल यांनी व्यक्त केले आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील उत्कंठा ताणून ठेवणाऱ्या सामन्यात मैदानातील पंचांच्या चुकीमुळे इंग्लंडला एक अवांत धाव मिळाली. पंचांसाठी हा निर्णय घेणे सोपे नव्हते, असा उल्लेख करत मैदानात पंचांकडून अशी चूक होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
नेमंक काय आहे प्रकरण
सामन्याच्या अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत असताना गप्टिलने मारलेला थ्रो केलेला चेंडू बेन स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेपलीकडे गेला. यावेळी पंचांनी २ + ओव्हर थ्रोच्या स्वरुपात ४ धावा दिल्या. फलंदाजाने आपली दुसरी धाव पूर्ण केली नसल्याने पंचांनी ५ धावा देणे अपेक्षित होते, असे टफेल यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे इंग्लंडच्या चॅम्पियन रुबाबावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पण क्रिकेटच्या मैदानात पंचाचा निर्णय अंतिम मानून आपण निकाल स्वीकार करायलाच हवा.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना नव्याने अर्ज करावा लागणार