पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC च्या 'या' निर्णयामुळे टी-20-वर्ल्ड कप स्पर्धाही संभ्रमात

ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगमी टी-20 विश्वचषक स्पर्धेवरही कोरोनाचे सावट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत होणारे सर्व पात्रता फेरीसाठीचे सामने स्थगित केले आहे. आयसीसीच्या या भूमिकेमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसह 2023 मध्ये होणाऱ्या मर्यादित षटकांच्या विश्वचषकाच्या वेळापत्रकामध्येही बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

महासंकटाच्या काळात असंवेदनशीलता दाखवू नका : आरोग्यमंत्री

पुढील दोन महिन्यात पुरुष टी-20 वर्ल्ड कप आणि 2023 च्य एकदिवसीय वर्ल्डकपसाठी पात्रता फेरीतील सामने खेळवण्यात येणार होते. याशिवाय अन्य 6 स्पर्धेला आयसीसीने स्थगिती दिली आहे  

आयसीसी स्पर्धेचे मुख्य आयोजक क्रिस टेटले यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थितीमुळे सरकारने प्रवास टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. आम्ही  जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत पात्रता फेरीतील सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाशी लढ्यासाठी सचिन आला धावून, सर्वात मोठी आर्थिक मदत

आयसीसीच्या या निर्णयामुळे आगामी टी-20 विश्वचषकावरही संकट घोंगावताना दिसते आहे. यापूर्वी कोरोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षांनी पुढे ढकलण्याचा मोठी निर्णय क्रीडा क्षेत्रात घेण्यात आला होता. एवढेच नाही तर लोकप्रिय फुटबॉल लीगच्या स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. परिस्थिती जैसे थे असल्यामुळे आयपीएल स्पर्धेवरील संकट कायम असताना आता आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा धोक्यात आल्याचे दिसत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc defers all qualifying tournaments till 30 june t20 world cup 2021 and odi world cup 2023 will be affected