पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC World Cup : एन्गिडीला सलग षटकार खेचत मॉर्गनने नोंदवला खास विक्रम

इयॉन मॉर्गन

England vs South Africa World Cup 2019: इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषकाती सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने खास विक्रम आपल्या नावे केला. लुंगी एन्गिडीला सलग दोन षटकार लगावत मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक ७ हजार धावांचा टप्पा पार केला. इंग्लंडकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वीच त्याच्या नावे होता. सलामीच्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

ICC WC 2019 : यंदाच्या वर्ल्ड कपमधून आपला सचिन नवी इनिंग सुरु करतोय!

इयॉन मॉर्गन  इंग्लंडच्या ताफ्यात येण्यापूर्वी आयर्लंडकडून काही आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. दोन्ही संघाकडून केलेल्या धावा मिळून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही मजल मारली आहे. यात इंग्लंडकडून खेळताना त्याने ६ हजार २०० धावा केल्या असून उर्वरित धावा या आयर्लंडकडून प्रतिनिधीत्व करताना केल्या आहेत. 

WC 2019: विराट वर्ल्डकप जिंकून देईल, कपिल पाजींना विश्वास

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टोला ताहिरने पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद केले. जेसन रॉय (५४) आणि जो रुट (५१) धावा करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गननेही ५७ धावांची बहुमुल्य खेळी केली.    

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc cricket world cup england cricket team south africa national cricket team eoin morgan completes 7000 runs in odi cricket set new cricket record him self