पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विराटचा भारतीय संघ भारी, पण विश्वचषक स्पर्धा सर्वांसाठी खुली'

भारतीय क्रिकेट संघ

आगीमी विश्वचषकात विराटच्या नेतृत्वाखालील भारताचा १५ सदस्यीय संघ उत्कृष्ट आणि समतोल आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी  क्रिकेटर आणि अफलातून क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्सने म्हटले आहे. भारताला त्याने स्पर्धेतील उत्कृष्ट संघ असे प्रमाणपत्र दिले असले तरी ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याचेही त्याने म्हटले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये जॉन्टी ऱ्होड्स यांनी आगामी विश्वचषकाबद्दल प्रतिक्रिया दिली. 

"विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये समतोल आहे. परंतु ते इतर संघाकडे नाही असे नाही. भारतीय संघात निवड झालेले १५ सदस्य उत्कृष्ट आहेत. मात्र यंदाच्या विश्वचषकात आणखी सहा संघही अधिक मजबूत आहेत. त्यामुळेच प्रत्येक सामन्यात परिस्थितीनुसार समतोल टिम इलेव्हनची निवड महत्त्वाची ठरेल," असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून क्रिकेट जगतात छाप सोडलेल्या जॉन्टी ऱ्होड्स यांनी म्हटले आहे.       
 .
..म्हणून सचिन-धोनीपेक्षा आफ्रिदीची विराटला पसंती

२०१९ चा विश्वचषक हा रॉबिन राउंड पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. या पद्धतीनुसार स्पर्धेत सहभागी झालेले सर्व दहा संघ एकमेकांसोबत सामना खेळणार आहेत. यातील गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ५ जूनला भारतीय संघ साउथेप्टनच्या मैदानातून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात करणार आहे.

यावेळी ऱ्होड्स म्हणाले की, "भारतीय संघाकडे चांगला अनुभव आहे. याशिवाय डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची क्षमता असणारा जसप्रीत बुमराह सारखे युवा खेळाडूही आहेत. पण स्पर्धेत त्यांना सहा संघ तगडे आव्हान देण्याची क्षमता असणारे आहेत. विश्वचषकातील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. प्रत्येक सामन्यातील गुण स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, त्यामुळे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे." 

विश्वचषकापूर्वी बार्मी आर्मीचा वॉर्नरला बाऊन्सर!
 

यापूर्वी १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये संयुक्तरित्या आयोजित विश्वचषकात रॉबीन राउंड पद्धतीने सामने खेळवण्यात आले होते. यात पाकिस्तानने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत विजेतेपद मिळवले होते. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Cricket World Cup 2019 Virat Kohlis India are a balanced side but WC wide open Jonty Rhodes