पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोहलीने उलगडले कार्तिकच्या निवडीचे 'राज'

विराट कोहली आणि दिनेश कार्तिक


इंग्लंड आणि वेस्लमध्ये रंगणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघात पर्यायी यष्टिरक्षक म्हणून युवा ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली होती. बीसीसीआयच्या निवडसमितीने दिनेश कार्तिकची निवड केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही आगामी विश्वचषकात पंतची उणीव भासेल, असे म्हटले होते.

पंतची यंदाच्या विश्वचषकात खेळण्याची आशा संपली

त्यानंतर आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिनेश कार्तिकच्या निवडीबाबत खुलासा केला आहे. आगामी विश्वचषकात महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा मुख्य यष्टिरक्षक आहे. त्याला पर्याय म्हणून निवड समितीने दिनेश कार्तिकला दिलेली संधी ही त्याच्यातील क्षमतेमुळे मिळाल्याचे कोहलीने म्हटले आहे. 

Video : पाकविरुद्ध बटलर बरसला, ५० चेंडूत शतकाला गवसणी

दबावाच्या परिस्थितीत दिनेश कार्तिकने काही चांगल्या खेळी करुन आपल्यातील क्षमता सिद्ध केल्यानेच निवड समितीने त्याला पहिली पसंती दिली. त्याच्याकडे अनुभव आहे. स्पर्धेदरम्यान जर धोनी एखादा सामना खेळू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर यष्टिमागेही कार्तिक चांगली कामगिरी करु शकतो, त्यामुळेच त्याला आगामी विश्वचषकात संघात स्थान मिळाले, असे कोहलीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीध्ये म्हटले आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Cricket World Cup 2019 Virat Kohli reveals why Dinesh Karthik was picked ahead of Rishabh Pant