पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: रवी शास्त्रींनी चाहत्यांना दाखवली धोनीची जर्सी

रवी शास्त्री (PTI)

गुरुवारी पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा सामना रद्द करावा लागला. यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला. 

रॉयल्टीचे पैसे न दिल्याने सचिनचा ऑस्ट्रेलियातील कंपनीविरुद्ध दावा

याचदरम्यान प्रेक्षकांना खूश होण्याची एक संधी मिळाली. पावसामुळे नाराज झालेले चाहते भारतीय बाल्कनीच्या खाली उभे राहून 'धोनी-धोनी' च्या घोषणा देत होते. त्याचवेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री बाल्कनीत आले आणि त्यांनी धोनीची सात क्रमांकाची जर्सी चाहत्यांना दाखवली. शास्त्रींच्या या कृतीमुळे चाहत्यांमध्ये जोश निर्माण झाला.

ICC WC 2019 : ...तरच भारतीय संघाला पराभूत करु शकाल, वकारचा पाकला सल्ला

दरम्यान, सामना न झाल्यामुळे भारत आणि न्यूझीलंडच्या संघाला समसमान गुण देण्यात आले. पावसामुळे सामना रद्द होणारा हा विश्वचषकातील चौथा सामना होता. न्यूझीलंडचा संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यांनी चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. एक सामना रद्द झाला आहे. तर पाच गुणांसह भारत तिसऱ्या स्थानी आहे.

WC Point Table : पाऊस एक नंबरी, सोशल मीडियावर प्रतिक्रियांची 'बरसात'