पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाकचा मानहानीकारक पराभव

वेस्ट इंडिज संघ

सलामीवीर ख्रिस गेलचे अर्धशतक आणि निकोलस पूरनच्या नाबाद ३४ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने पाकिस्तानला ७ गडी राखून पराभूत केले. पाकिस्तानने दिलेल्या १०६ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने अवघ्या १३. ४ षटकात पार केले. सलामीवीर ख्रिस गेलने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या.

शाई होप ११ धावा करुन तंबूत परतल्यानंतर मैदानात उतरलेल्या डेरेन ब्रावोला आमीरने खातेही उघडू दिले नाही. आक्रमक अंदाजात फलंदाजी करणाऱ्या ख्रिस गेललाही त्यानेच बाद केले. पण धावफलकावर अल्प धावसंख्या असल्यामुळे आमीरची गोलंदाजी  वेस्ट इंडिजसाठी फारशी डोकेदुखी ठरली नाही. रियाझच्या चेंडूवर षटकार खेचत पूरनने वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेटमायर ७ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजचे पहिले तीन फलंदाजांना अमीरनेच बाद केले. 

ICC चा क्रिकेट चाहत्यांना सवाल, रिप्लाय देण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा

तत्पूर्वी क्रिकेट विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार जेसन होल्डरने घेतला निर्णय वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कॉट्रेलने तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सलामीवीर इमाम उल हक याला अवघ्या २ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर मसल पॉवर रसेलने फखर झमान (२२) हरिश सोहिल (८) यांना बाद करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. थॉमसने विश्वचषकातील विकेटचे आपले वैयक्तिक खाते उघडताना बाबर आझमला २२ धावांवर माघारी धाडले.

ICC WC : स्टोक्सच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इंग्लंडची विजयी सलामी

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यामुळे पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर आला. मोहम्मद हाफिज (१६) आणि तळाचा फलंदाज वहाब रियाज (१८) वगळता कोणत्याही पाक फलंदाजांना वैयक्तिक धावसंख्येचा दुहेरी आकडा पार करता आला नाही. वेस्ट इंडिजकडून थॉमसने ४ आणि कर्णधार जेसन होल्डरने ३ बळी मिळवले. रसेलने २ आणि कॉर्टेलने एक गडी मिळवत त्यांना उत्तम साथ दिली.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc cricket world cup 2019 pakistan vs west indies match live Result and score card from trent bridge ground