पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर. अश्विनची विश्वकरंडक स्पर्धेत टीम इंडियासाठी मोठी भविष्यवाणी

आर. अश्विन

ऑस्ट्रेलियाच्या संघाने २००३ आणि २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ज्याप्रमाणे आपला दबदबा निर्माण केला होता. त्याचप्रमाणे सध्याच्या विश्वकरंडक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे, असे फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने म्हटले आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवले आहेत.

अश्विन फाऊंडेशनच्या उदघाटनानंतर बोलताना रविचंद्रन अश्विन म्हणाला, सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारत तसाच दबदबा निर्माण करेल, जसा २००३ आणि २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने निर्माण केला होता. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकीपटूंची जोडी चांगली कामगिरी करीत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

ICC WC 2019 : शिखर धवन संघासोबत राहणार, BCCI चे स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही खूप चांगली कामगिरी करीत आहेत. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत चहलची कामगिरी लक्षवेधक आहे. ऑफ स्पिनरला अंतिम संघात स्थान मिळत नसल्याचे सध्या दिसते आहे. पण लवकरच हे चित्र बदलेल, असे अश्विनने म्हटले आहे.

अश्विन इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी २३ जूनला रवाना होणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc cricket world cup 2019 off spinner r ashwin says india will dominate world cup like australia did as 2003 and 2007