आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील चोकर्सचा डाग मिटवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला आता पुन्हा पुढील चार वर्षांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. न्यूझीलँड विरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेली आपले आव्हान टिकवण्यासाठी बर्मिंघमच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलँडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा होता. पण किवी कर्णधार केन विलियमसनने शतकी खेळी करत आफ्रिकेचा विश्वचषक स्पर्धेतील जीव काढून घेतला.
एबी वर्ल्ड कपमध्ये खेळायला तयार होता, पण...
सामन्यानंतर केन विलियमसनने प्रतिस्पर्धी संघ मजबूत होता. त्यांना पराभूत करणे कठिण होते, असे म्हणत दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्याचे कौतुक केले असले तरी स्पर्धेतील आव्हान संपल्यामुळे विलियमसनचे हे बोल आफ्रिकेची जखम भरुन येणार नाही. न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात एका आणि चार पराभवासह ३ गुण जमा झाले असून गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका आठव्या स्थानावर आहे. विश्वचषक स्पर्धेत १९९२ नंतर यंदा दुसऱ्यांदा ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी असलेले १० संघ प्रत्येक संघासोबत प्रत्येकी एक सामना खेळणार असल्यामुळे प्रत्येक संघाच्या नऊ सामन्यातील गुणांवर अंतिम चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या परिस्थितीमुळे सुरुवातीपासून रटाळ खेळी करणारा दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
#NzvsSA आफ्रिका 'करो वा मरो'च्या चक्रव्यूहात
दक्षिण आफ्रिकेचे उर्वरित तीन सामने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. पुढील तीन सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा सामना त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक असेल. तिन्ही सामने जिंकले तरी उपांत्यफेरीतील स्थान मिळणे धुसर झाले आहे. उर्वरित सामन्यात चांगला खेळ दाखवून शेवट गोड करणे हाच त्यांच्याकडे एक पर्याय उरला आहे.