पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ कुठं नेऊन ठेवलंय शमीला आमच्या, नेटकरी संतापले

मोहम्मद शमीला संधी न दिल्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघात शमीला स्थान न मिळाल्याने क्रिकेट प्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे. ट्विटरवर शमी हॅश टॅग ट्रेंडमध्ये असून नेटकरी शमीला संघात स्थान का नाही? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. 

एका नेटकऱ्याने शमीची स्पर्धेतील कामगिरीचा दाखला देत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शमीला संधी मिळायलाच हवी होती, असे म्हटले आहे. ४ सामन्यात एका हॅटट्रिकसह १४ बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाला बाहेर कसे बसवू शकता? असा प्रश्नच या नेटकऱ्याने विराट आणुि संघ व्यवस्थापनाला केला आहे.

#INDvNZ मैदानात उतरताच धोनीच्या नावे विक्रमाची नोंद

दुसऱ्या एका नेटकऱ्याने भुवीपेक्षाही तो सध्या फॉर्ममध्ये असताना त्याच्या ऐवजी भुवीला संधी मिळणे अपेक्षित नसल्याची भावना व्यक्त केली आहे. विश्वचषक स्पर्धेत भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेल्या शमीने ४ सामन्यात १४ बळी मिळवले आहेत. यात एका हॅटट्रिकचाही समावेश आहे.

दुसरीकडे भुवनेश्वर कुमारने ६ सामन्यात केवळ ७ गडी बाद केले आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहते ट्विटरच्या माध्यमातून शमीला संघात स्थान का नाही? असा प्रश्न कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयला विचारत आहेत. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc cricket world cup 2019 new Zealand semi final mohammed shami out of playing xi indian cricket team