बेन स्टोक्सच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ओव्हलच्या मैदानावर रंगलेल्या विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर जॉनी बेअरस्टोला तंबूत धाडत ताहिरने कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे संकेत दिले.
पण त्यानंतर जेसन रॉय (५४) आणि जो रुटने संयमी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला. कर्णधार इयॉन मॉर्गन (५७) आणि अष्टपैलू बेन स्ट्रोक्सच्या ८९ धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेच्या मनसुब्याला सुरुंग लावाला. आघाडी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सलामीच्या सामन्यात निर्धारित ५० षटकात ८ बाद ३११ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक तीन तर ताहिर रबाडा यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
ICC WC 2019 : यंदाच्या वर्ल्ड कपमधून आपला सचिन नवी इनिंग सुरु करतोय!
या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक (६८) आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसन (५०) अर्धशतकी खेळी दक्षिण आफ्रिकेचा पराभव टाळण्यात अपयशी ठरली. या दोन फलंदाजांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा डाव ३९.५ षटकात २०७ धावांत आटोपला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन बळी टीपले. तर प्लँकेट आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन आणि मोइन अली- अदील राशीद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
ICC World Cup : एन्गिडीला सलग षटकार खेचत मॉर्गनने नोंदवला खास विक्रम