पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : आयसीसीच्या या ट्विटमुळे सुरु झाली लग्नाची चर्चा!

 लॉरा वॉलवार्टने विराटच्या शैलीत अप्रतिम फटका खेळल्याचे पाहायला मिळाले

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवीर आयसीसीच्या ट्विट अकाउंटवरील कोही पोस्ट चांगल्याच चर्चेत आहेत. यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आफ्रिकेच्या लॉरा वॉलवार्टने खेळलेल्या अप्रतिम फटक्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे दिसते. आयसीसीने मजेशीर कॅप्शनसह तिचा व्हिडिओ शेअर केला असून यावर गंमतीशीर प्रतिक्रिया उमटत आहेत. 

ICC W T20 WC : ज्या संघांनी स्पर्धेची सुरुवात केली शेवटही तेच करणार

लॉरा वॉलवार्टचा व्हिडिओ शेअर करत क्रिकेटमधील एका सुंदर फटक्यासोबत लग्न करणे शक्य आहे का? असा प्रश्न आयसीसीने विचारला आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका नेटकऱ्याने अप्रतिम फटक्यासोबत लग्न करणे शक्य नाही पण जिने फटका मारला तिच्यासोबत लग्न करणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी अप्रतिम फटक्यावरील प्रेम व्यक्त करताना एबीची आठवण करुन देत होय, असे उत्तर दिले आहे. 

Video : साडी नेसून फलंदाजी करत मितालीचा भारतीय संघाला खास संदेश

आफ्रिकेच्या लॉराने सेमीफायनलमध्ये २७ चेंडूत ४१ धावांची खेळी केली होती. यात तिने ३ चौकार आणि २ षटकार खेटले होते. यातील एक चौकार तिने कोहलीच्या शैलीत लगावला. तिच्या या स्ट्रोकचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तिचे चांगलेच कौतुक होत आहे. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात १३४ धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययानंतर दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना १३ षटकात ९८ धावांचे आव्हान मिळाले. लॉराने तुफान फटकेबाजी केली पण तरीही आफ्रिकेला मिळालेले आव्हान पार करता आले नाहीत. ऑस्ट्रेलियन महिलांना त्यांना  ६ धावांनी पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc asked Is it possible to marry a cricket shot fans gave funny comments laura wolvaardt sa w vs aus w 2nd semifinal match icc womens t20 world cup