आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन क्रिकेट चाहत्यांना दशकातील सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न विचारला होता. क्रिकेट चाहत्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना विद्यमान कर्णधार विराट कोहलीला पंसती न देता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हाच दशकातील सर्वोत्तम कर्णधार असल्याचे म्हटले आहे. कर्णधार विराट हा सुद्धा धोनी हाच माझा कॅप्टन असल्याचे सांगतो त्यामुळे चाहत्यांनी विराटच्या नेतृत्वावर नाराज असल्याचा प्रश्नच उरत नाही.
बुमराहसाठी दादानं प्रोटोकॉल ठेवला बाजूला
महेंद्रसिंह धोनीने २०१७ मध्ये एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी २०१४ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी स्पर्धा गाजवल्या आहेत. यात टी-२० वर्ल्ड कप, मर्यादीत षटकांचा वर्ल्डकप आणि मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेचा समावेश आहे. आयसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या तीन मोठ्या स्पर्धेत संघाला यश मिळवून देणारा क्रिकेट जगतातील धोनी हा एकमेव कर्णधार आहे.
सचिनच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये झालेला टी-२० चा पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ मध्ये मायदेशात पार पडलेल्या मर्यादीत षटकाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने बाजी मारली होती. तर २०१३ मध्ये भारताने आयसीसी चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकली होती. धोनीनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र आयसीसीच्या स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा आली आहे. २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या चॅम्पियन चषक स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर यंदाच्या वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघाच्या पदरी निराशा आली होती. विश्वचषकातील प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने पराभवाचा धक्का दिला होता.
Tell us who your favourite captain of the decade is.
— ICC (@ICC) December 25, 2019
Go 👇