पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC : विजय शंकरच्या जागी मयांकच्या नावावर शिक्कामोर्तब!

मयांक अगरवाल

आयसीसी विश्वचषकातील अखेरच्या टप्प्यात अष्टपैलू विजय शंकरच्या जागी मयांक अगरवालच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे विजय शंकरचा विश्वचषकातील प्रवास निम्म्यावरच थांबला. सरावादरम्यान बुमराहच्या चेंडूने त्याला दुखापत झाली होती. 

अष्टपैलू विजय शंकर स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर राखीव खेळाडूमधील रायडूचे नाव समोर न येता मयांक अगरवालला संधी मिळणे क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्काच आहे. याच कारण म्हणजे कर्नाटकच्या सलामीवीराने कसोटीत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असले तरी एकदिवसीयमध्ये तो अद्याप भारताकडून खेळलेला नाही.

ICC WC : रोहितनं पुन्हा एकदा घेतली पत्रकाराची फिरकी

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलच्या पाठीला दुखापत झाली होती. या सामन्यात क्षेत्ररक्षण न करता तो केवळ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याला खातेही उघडता आले नव्हते. त्याच्या दुखापतीबद्दलही काही चर्चा नाही. त्याची दुखापत वाढली तर सलामीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मयांकला संधी देण्यात आलेली आहे का? हे कळायला मार्ग नाही. जर त्याला खेळण्याची संधी मिळाली तर तो वर्ल्ड कपमधून एकदिवसीय पदार्पण करण्याचा एक मान मयांकला नक्कीच मिळेल.