मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या सर्वोत्कृष्ट संघांतून धोनीला वगळल्यानंतर आता आयसीसीने जारी केलेल्या संघात भारताचा कर्णधार विराट कोहलीला स्थान दिलेलं नाही. विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आयसीसीने आपला सर्वोत्कृष्ट संघ निवडला आहे. या संघात विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघातील चार तर उपविजेत्या न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंचा सहभाग आहे.
Your #CWC19 Team of the Tournament! pic.twitter.com/6Y474dQiqZ
— ICC (@ICC) July 15, 2019
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी दोन तर बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूला स्थान मिळाले आहे. आयसीसीने सलामीसाठी भारताचा रोहित शर्मा आणि इंग्लंडचा जेसन रॉय यांना पसंती दिली असून नेतृत्वाची जबाबदारी ही केन विल्यम्सनकडे सोपवली आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन, इंग्लंडचा जो रुट आणि बेन स्टोक्स यांना मध्यफळीतील फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. यष्टिरक्षक म्हणून अॅलेक्स कॅरीला स्थान मिळाले आहे.
सचिन तेंडुलकरच्या 'वर्ल्ड कपXI'मध्ये धोनी नाही
गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, फर्ग्युसन आणि बुमराह यांना पंसती दिली असून ट्रेंट बोल्टला बारावा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
आयसीसीचा संघ
रोहित शर्मा, जेसन रॉय, केन विल्यम्सन (कर्णधार), शाकिब अल हसन, जो रुट, बेन स्टोक्स, अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, लॉकी फर्ग्युसन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट