महिला टी-२० विश्वचषकानंतर आयसीसीने आपला सर्वोत्तम महिला संघ निवडला आहे. आयसीसीच्या १२ सदस्यीय महिला संघात केवळ दोन भारतीय महिलांचा समावेश असून स्पर्धेत धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या शेफालीला बारावे स्थान मिळाले आहे. तर फिरकीपटू पूनम यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
...तर IPL सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश नसेल!
विश्वचषकातील कामगिरीच्या जोरावर आयसीसीने हा संघ निवडला आहे. यात सर्वाधिक पाच ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे. पूनम यादवने ११.९० च्या सरासरीने पाच स्पर्धेत १० विकेट्स घेतल्या होत्या. तर शेफालीने १५८.२५ च्या स्ट्राइक रेटने १६३ धावा केल्या होत्या. अंतिम सामन्यात तिच्याकडून भारतीय संघाला अपेक्षा होत्या. मात्र मेलबर्नवर ती अवघ्या दोन धावा करुन माघारी फिरली होती.
MCG वरील विक्रमी गर्दी ही महिला क्रिकेटसाठी 'अच्छे दिन'चे संकेत
शेफालीच्या अपयशासोबतच कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप कर्णधार स्मृती मानधनाच्या फलंदाजीती अपयशामुळे भारतीय संघाला मेलबर्नच्या मैदानात ८५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाला पाचव्यांदा टी-२० विश्वचषक मिळवून देणात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या सलामीची फलंदाज बेथ मूनी आणि एलिसा हिली यांच्यासह कर्णधार मेग लेनिंग, जेस जोनासेन आणि मेगान स्कूट यांना आयसीसीच्या संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडच्या चार खेळाडूंचा संघात समावेश असून दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.
Video : ..अन् शेफालीला अश्रू अनावर झाले!
आयसीसी महिला टी२० विश्व कप टीम: एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया), नेट स्किवेर (इंग्लंड), हिथर नाइट (इंग्लंड), मेग लेनिंग (ऑस्ट्रेलिया), लॉरा वोल्वार्ट (दक्षिण आफ्रिका), जेस जोनासेन (ऑस्ट्रेलिया), सोफी एसेलेस्टोन (इंग्लंड), आन्या श्रुबसोले (इंग्लंड), मेगान शूट (ऑस्ट्रेलिया), पूनम यादव (भारत). राखीव: शेफाली वर्मा (भारत)
Introducing your Women's #T20WorldCup 2020 Team of the Tournament 🌟 pic.twitter.com/Eb4wQUc7Ls
— T20 World Cup (@T20WorldCup) March 9, 2020