पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गांगुलीनं मनावर घेतलं तर पुजारा-रहाणेचं वेतन वाढेल

पुजारा आणि रहाणे

भारतीय संघाच्या एका प्रारुपात खेळणाऱ्या खेळाडूच्या मानधनामध्ये वाढ करायला हवी, हा मुद्दा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनेकदा उचलून धरला आहे. विशेष करुन कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी योगदान देण्याऱ्या खेळांडूवर त्याने भर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे मर्यादीत षटकाच्या सामन्यात किंवा आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याबद्दल त्यांना खंत वाटणार नाही. कर्णधार विराट कोहलीचा हा मुद्दा आता भारतीय क्रिकेट मंडळाच्या महिला सदस्या शांता रंगास्वामी यांनी देखील उपस्थित केला आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धूरा हाती घेतल्यानंतर या मुद्यावर प्रामुख्याने लक्ष दिले जाईल, असा विश्वास शांता स्वामी यांनी व्यक्त केला आहे.  

INDvsSA Day 1 Stumps : भारत ३ बाद २२४ धावा (५८)

आयएएनएसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्या म्हणाल्या की, कर्णधार विराट कोहलीची भूमिका योग्य आहे. खेळाडूंसोबतच्या नव्या करारामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या मानधनाबाबत प्राधान्याने विचार व्हायला हवा, असे शांता रंगास्वामी यांनी म्हटले आहे. आपल्याकडे पहिल्यापासूनच श्रेणी पद्धती आहे. विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे तो उच्च श्रेणीत आहे. काही खेळाडू टी-२० तर काही फक्त कसोटीमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्यासाठी वेगळी श्रेणी आहे. त्यानुसार इतर खेळांडूपेक्षा एका प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना कमी मानधन मिळते. 

INDvsSA Test : नदीम संधीचं सोनं करणार?

गांगुलीने सूत्रे हाती घेतल्यानंतर या श्रेणी प्रणालीबाबत नव्याने विचार होऊ शकतो. यामुळे खेळाडूंना योग्य न्याय देणे शक्य होईल. विराटने हा मुद्दा उचलून धरताना काही तरी विचार केलेला असेल. पुजाराशिवाय अजिंक्य रहाणे भारतीय टी-२० संघात प्रतिनिधीत्व करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या मानधनाबाबत विचार करण्याची गरज आहे, असे शांता रंगास्वामी म्हणाल्या आहेत. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ica member Shantha Rangaswamy says chetewhwar pujara and ajinkya Rahane salary should increase