पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जर धोनी असेल तर मी पुढचा वर्ल्ड कप खेळेन : एबी

एबी डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंह धोनी

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषकात खेळावे, अशी त्याच्या प्रत्येक चाहत्याची इच्छा होती. मात्र, मागील वर्षी आश्चर्यकाररित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याच्या चाहत्यांनी यंदाच्या विश्वचषकात त्याची फटकेबाजी पाहायला मिळणार नाही. निवृत्तीनंतरही चाहते त्याने पुन्हा मैदानात उतरावे, अशी इच्छा बाळगून होते. पण तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न परतल्यामुळे आगामी विश्वचषकात तो मैदानात दिसणार नाही.

ICC WC 2019: केदार फिट, भारतीय संघासोबत इंग्लंडला जाण्यास सज्ज

आगामी विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी एबीने पुढील विश्वचषकात खेळण्याची तयारी दाखवली आहे.  मात्र यासाठी त्याने एक अजब आणि गजब 'जर-तर'च्या समीकरणं सांगितले आहे.  गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात डिव्हिलियर्सला विश्वचषकाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. २०२३ च्या विश्वचषकात सहभागी तू पुन्हा मैदानात उतरशील का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर डिव्हिलियर्स म्हणाला की, जर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळू शकतो तर मी देखील खेळू शकतो.

ICC ने उघडला बक्षिसांचा पेठारा, विश्वविजेता होणार मालामाल

एबी म्हणाला की, २०२३ मध्ये मी ३९ वर्षांचा असेल. त्यावेळी धोनी विश्वचषक स्पर्धेत खेळला आणि माझी कामगिरी चांगली होत असेल तर मी देखील स्पर्धेत खेळू शकतो. सध्याच्या घडीला धोनी ३७ तर डिव्हिलियर्स ३५ वर्षांचा आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणारी विश्वचषक स्पर्धा ही धोनीसाठी शेवटची विश्वचषक स्पर्धा असेल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. त्यामुळे एबी भविष्यात पुन्हा मैदानात दिसू शकतो, हा जर-तरचा योगच म्हणावा लागेल.