पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाना द्यावा, हिनाची शहांकडे मागणी

भारतीय नेमबाज हिना सिद्धू

हैदराबादमधील २६ वर्षीय पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैदराबाद बलात्कार प्रकरणानं देश हादरला असून देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारतीय महिला नेमबाज हिना सिद्धू हिने देखील या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाना द्या, अशी मागणीच तिनें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा लावला पोलिसांनी नराधमांचा छडा

हिनाने ट्विटच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी देशभरात महिला सुरक्षित नाहीत. महिलांना सुरक्षितपणे वावरता यायला हवे. त्यांना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यायला हवे. पोलीस आणि संरक्षक दले आमच्यासाठी नाहीत, अशा संतप्त शब्दांत तिने  देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाने देऊन त्यांना शस्त्र वापरण्याचा परवाना देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरण : 'निर्भया'च्या आईची विनंती

हैदराबादमधील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात चार  आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना फाशी व्हावी, अशी मागणी देखील होत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:I request the home ministry and honorable home minister Amit Shah to make licenses and licensed weapons mandatory for every woman in country Says Heena Sidhu