पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पत्नीच्या काळजीपोटी त्याने आयपीएलमधून माघार घेतली

एमी वोक्स आणि क्रिस वोक्स

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या सर्वच स्पर्धांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे. भारतातील लोकप्रिय असलेली आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली आहे. ही स्पर्धा होणार की नाही याचा संभ्रम असताना इंग्लंडच्या माजी क्रिकेटर्सने स्पर्धेतून माघार घेतल्याचा पश्चाताप होत असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडमधील कसोटी हंगामासाठी फिट राहण्यासाठी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केल्याचे वोक्सने सांगितले होते. त्यानंतर आता क्रिस वोक्सने अधिकृतरित्या अशी भूमिका घेण्याची गरज नव्हती, अशी खंत व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर आयपीएलमधून माघार घेण्याचे खरे कारण हे त्याची पत्नी गर्भवती असल्याचे होते, हे देखील समोर आले आहे.  

'आम्ही संघासाठी तर भारतीय खेळाडू स्वत:साठी खेळायचे'

आयपीएलच्या लिलावत दिल्ली कॅपिटल्सने दिड कोटी मोजून वोक्सला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. 'द क्रिकेटर'च्या वृत्तानुसार, वोक्सने म्हटलंय की, मी आयपीएलमधून माघार घ्यायला नको होती. त्यावेळी मी नेमके कारण सांगितले नव्हते. पण सप्टेंबरमध्ये माझ्या घरी नवा पाहुणा येणार आहे. हे देखील स्पर्धेतून माघार घेण्याचे एक कारण होते. माझ्या पत्नीची (एमी वोक्स) प्रकृती अस्थिर होती. अशा परिस्थितीत तिच्यापासून तीन महिने दूर राहणे योग्य वाटत नसल्यामुळे स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांपेक्षा अधिक काही नसते, असेही त्याने सांगितले.  

दादा ओरडत असताना कैफ म्हणाला होता की, मी पण खेळायला आलोय!

 वोक्सने ऑगस्ट २०१८ नंतर एकही टी २० सामना खेळलेला नाही. परंतु या प्रकारातून कायम बाद झालेलो नाही, असेही त्याने स्पष्ट केलय. माझे टी २० क्रिकेटची कारकिर्द संपलेली नाही. मी अजूनही आयपीएलमध्ये खेळण्यास इच्छुक आहे, अशी भावना वोक्सने बोलून दाखवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउनसोबतच आयपीएल स्पर्धेचे काउंटडाउन वाढताना दिसत आहे. स्पर्धा होण्याची शक्यता ही दिवसेंदिवस कठिण होत आहे.