पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुखण्यात खेळून हार्दिक पांड्यानं मोठी चूक केली

हार्दिक पांड्या

भारतीय संघाटचा अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्याच्या घडीला क्रिकेटपासून दूर आहे. पाठिच्या शस्त्रक्रियेनंतर तो आता क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी स्वत:ची मानसिकता मजबूत करत आहे. क्रिकेट माझ्या रक्तात असून मी अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही, असेही हार्दिक पांड्याने म्हटले आहे.

Video : धावबाद सोडलं म्हणून कौतुकास पात्र ठरेला हा पहिलाच क्षेत्ररक्षक

आएएनएसच्या वृत्तानुसार हार्दिक पांड्या म्हणाला की, दुखापतीमुळे संघाबाहेर असणे वेदनादायी वाटते. पण मला स्वत:वर संयम ठेवावा लागेल. मी माझ्यासह संघावर अन्याय करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. मी पाठिची दुखापत असतानाही खेळलो. शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ नये यासाठी अन्य सर्व उपाय केले. मात्र शेवटी शस्त्रक्रिया करावीच लागली. ज्यावेळी १०० टक्के फिट नसल्याचे जाणवले तेव्हा मी हा निर्णय घेतल्याचेही हार्दिक पांड्याने सांगितले.

लष्करातील शूरवीरांवर मालिका, महेंद्रसिंग धोनी करणार निर्मिती

दुखापतीकडे दुर्लक्ष करुन खेळत राहिल्यामुळे क्षमतेनुसार खेळू शकलो नाही. मी माझ्यासह संघाला न्याय देऊ शकलो नाही. त्यानंतर मी शस्त्रक्रिया करण्याच निर्णय घेतला. दुखापतीतून सावरत असून पूर्वीप्रमाणे संपूर्ण क्षमतेसह मैदानात उतरण्याच्या दृष्टिने तयारी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दुखापतीनंतर संघात स्थान मिळवणे आणि पहिल्यासारखी कामगिरी करणे सोपे नसते. त्यामुळे मी अधिक मेहनत घेत असल्याचे तो म्हणाला.