पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला काही सिद्ध करायची गरज नाहीः विराट कोहली

विराट कोहली

विश्वचषकानंतर टी २० आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडीजला आलेल्या विराट कोहलीने मालिकेतील अंतिम सामन्यात ५९ धावांची शानदार खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात १४७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली टीम इंडिया एका क्षणी संकटात सापडली होती. २७ धावसंख्येवर त्यांनी आपले दोन्ही सलामीवीर गमावले होते. 

तेथून विराटने युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (नाबाद ६५) साथीने संघाला सावरत तिसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी करत विजय मिळवला. भारताने या सामन्यात ७ विकेटने विजय नोंदवला. 

T20 मध्ये विंडीजच्या नावे लाजिरवाणा विक्रम, भारताने पाकला टाकलं मागं

यापूर्वी अमेरिकेत खेळल्या गेलेल्या मालिकेतील दोन्ही सामन्यात विराटला चांगल्या सुरुवातीनंतरही (१९ आणि २८ धावा) मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. पण मंगळवारी ४५ चेंडूत ५९ धावांची खेळी करुन त्याने टीकाकारांना उत्तर दिले. 

या खेळीनंतर विराट म्हणाला की, मला वाटत नाही की माझ्या बॅटने मी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. मी फक्त आपले कर्तव्य पार पाडू इच्छितो. मी वैयक्तिक खेळी करत नाही.

पूरनच्या विकेटनंतर जल्लोष करणं सैनीला महागात पडलं

संघाला आम्ही योग्य मार्गावर आणणे हीच आमची भूमिका असते. मग यासाठी मी २०, ३०, ४० किंवा ५० धावा करु. मी मागील ११ वर्षांपासून असेच खेळत आहे. हे मला काहीच नवे नाही आणि कोणताही दबावही नाही, असे त्याने स्पष्ट केले.