पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'थ्रीडी गॉगल'च्या ट्विटचा पश्चाताप नाही : रायडू

अंबाती रायडू

इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने भारताचा मध्यफळीतील फलंदाज अंबाती रायडूने ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. त्याने थ्रीडी गॉगलचा संदर्भ देत केलेले ट्विट चांगलेच चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर रायडूने आणखी टोकाची भूमिका उचलत थेट सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र आता त्याने पुन्हा मैदानात परतण्याचे ठरवले आहे. 

अंबाती रायडूचा यू-टर्न, निवृत्तीचा निर्णय मागे

निवृत्तीचा निर्णयाबाबत यूटर्न घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी रायडूने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने निवड समितीला उद्देशून केलेल्या थ्रीडी बाबत ट्विटबद्दल कोणताही पश्चाताप वाटत नसल्याचे म्हटले आहे. 
विश्वचषक स्पर्धेसाठी निवड समितीने माझ्या कामगिरीकडे दुर्लक्ष केले, असेही त्याने सांगितले. या निर्णयामुळेच मी उपहासात्मक ट्विटसाठी प्रवृत्त झालो, अशी कबूलीही रायडूने दिली.  

नाराजीचा शेवट थेट निवृत्तीनं, रायडूचा क्रिकेटला 'रामराम'

निवृत्तीच्या निर्णयानंतर पुन्हा मैदानात उतरण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरही त्याने भाष्य केले. भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, हैदराबादचे नोएल डेव्हिड आणि चेन्नई सुपर किंग्ड फ्रेंचायजीमधील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा मैदानात उतरण्याच निर्णय घेतला, असे तो म्हणाला. काही दिवसांपूर्वीच  निवृत्तीनंतर रायडूने हैदराबाद क्रिकेट संघाला ईमेल पाठवत निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगत तिन्ही प्रकारात खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.