पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे क्रिकेटपटूला हार्टअ‍ॅटॅक, पॅव्हेलियनमध्ये मृत्यू

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे क्रिकेटपटूला हार्टअ‍ॅटॅक, पॅव्हेलियनमध्ये मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये क्रिकेटच्या मैदानावर एक खळबळजनक घटना घडली. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने एका क्रिकेटपटूचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. मृत क्रिकेटपटूचे नाव वीरेंद्र नायक असे आहे. ए ३ डिव्हिजन एकदिवसीय साखळी सामन्यात मरेडपल्ली स्पोर्टिंग क्लबकडून खेळणारा वीरेंद्र अर्धशतक करुन बाद झाला. त्याने रविवारी मरेडपल्ली ब्ल्यूजकडून खेळताना अर्धशतक ठोकले. बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. 

४१ वर्षीय वीरेंद्र यांची पत्नी गृहिणी असून त्यांना एक आठ वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. वीरेंद्र हे मेहदीपट्टनम येथील गुडीमल्कापूर येथील रहिवासी होतो. सोमवारी गांधी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आले. त्यांचे बंधू अविनाश यांनी वीरेंद हे हृदयविकारावर औषधे घेत होते. यात कोणतेही कट-कारस्थान नसल्याचे पोलिसांना सांगितले. 

वीरेंद्र यांच्या संघाने प्रथम फलंदाजी केली होती. वीरेंद्र यांना ६६ धावांवर पंचांनी झेलबाद दिले होते. बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये गेल्याचे पंचांनी सांगितले होते. परंतु, वीरेंद्र यांना पंचांचा निर्णय मान्य नव्हता. त्यानंतर वीरेंद्र पॅव्हेलियनमध्ये परतले आणि तिथेच कोसळले, असे संघाचा कर्णधार त्रिप्तसिंहने सांगितले. वीरेंद्र यांनी पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर आपले डोके भिंतीवर आदळले होते.

वीरेंद्र यांना त्वरीत यशोदा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पंच आणि विरोधी संघाच्या कर्णधाराने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.