पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दादा म्हणाला होता, 'कुठंन धरुन आणलय याला!

दिनेश कार्तिक आणि सौरव गांगुली

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत संधीच सोन करण्यात अपयशी ठरल्याने दिनेश कार्तिक सध्या संघाच्या बाहेर आहे. नुकताच तो एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्याने आपल्यासोबत क्रिकेट फिल्डवर घडलेला एक किस्सा शेअर केला. गांगुलीने त्याच्यासंबधात केलेली टिप्पणी सांगितल्यानंतर युवराज सिंगने यावर प्रतिक्रिया देत गांगुलीने नेमके काय म्हटले होते, त्याचा खुलासा केला.   

मैदानावरील गैरवर्तणूक विराटला भोवली, आयसीसीचा इशारा

२००४ मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकची बारावा खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले होते. याविषयीची आठवण सांगताना कार्तिक म्हणाला की, तो माझा पदार्पणाचा सामना होता. मला टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. पण तरीही माझ्या एका कृत्याने दादा (सौरव गांगुली) चांगलाच संतापला होता. विकेट पडल्यानंतर मी पाणी घेऊन मैदानात जायचो. यादरम्यान तोल गेल्याने माझा गांगुलीला धक्का लागला. यावेळी गांगुलीने कोण आहे रे हा? अशा शब्दात संताप व्यक्त केला. यावर युवराज सिंगने प्रतिक्रिया दिली आहे. 'कौन है रे ये पागल, कहां से पकड़ के लाते हैं !  अशा शब्दांत कार्तिकला खडसावले होते, असे युवराज सिंगने म्हटले आहे.  

VIDEO : चाहतीने I Love You ऋषभ म्हटल्यावर पुढे काय झाले पाहा...

भारत-पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राहुल द्रविड आणि अजित आगरकरच्या फंलदाजीच्या जोरावर भारताने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने ३ गडी राखून भारताला पराभूत केले होते.