पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी कसा काय विरोध करू शकतो? - शरद पवार

शरद पवार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या सचिवपदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय याची निवड झाल्याचे वृत्त सोमवारपासून देशभरात चर्चेत आहे. पण या घडामोडींबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार यांनी प्रत्येक राज्य संघटनेकडून त्यांचे प्रतिनिधी निवडले जातात आणि याच प्रतिनिधींकडून त्यांचे पदाधिकारी निवडले जातात. माझ्यापर्यंत जय शहा यांच्या निवडीबद्दल माहिती आलेली नाही. पण जर त्यांच्या संघटनेकडून त्यांची निवड करण्यात आली असेल, तर मी कसा काय विरोध करू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार हे २००५ ते २००८ या कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्ष राहिले आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड झाली असून, सचिवपदी जय शहा तर खजिनदारपदी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरूण धुमाळ यांची निवड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, काही राजकीय नेत्यांचे नातेवाईक बीसीसीआयच्या महत्त्वाच्या पदांवर येत असल्याचे मी ऐकले आहे. काही लोकांनी याला विरोध केल्याचेही मी ऐकले आहे. पण हे सर्व ठिक आहे. राज्याच्या क्रिकेट संघटनांकडून त्यांचे प्रतिनिधी निवडले जातात. मग याच प्रतिनिधींकडून पदाधिकारी निवडले जातात. मला सध्या केवळ सौरव गांगुली यांच्या नावाबद्दल कळले आहे. इतर नावांबद्दल थेटपणे मला माहिती कळालेली नाही. पण जर राज्याच्या संघटनेकडून त्यांची निवड झाली असेल, तर मी त्याला कसा काय विरोध करू शकतो, असे शरद पवार म्हणाले.

मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांडः विम्याच्या पावतीवरुन तिघांचा खून

क्रीडा समित्यांवर राजकीय नेत्यांची वर्णी लागण्याचा मुद्दाही शरद पवार यांनी उचलून धरला. मी अध्यक्ष असताना क्रिकेट संदर्भातील निर्णय विशेषाधिकार असलेली समितीच घेत होती. मी केवळ प्रशासकीय आणि अन्य निर्णय घेत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.