पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणी महिलांनी 'याची डोळा याची देही' अनुभवला फुटबॉल पाहण्याचा आनंद

इराणी महिलांनी अनुभवला फुटबॉल सामन्याचा थरार

इराणमध्ये दशकानंतर हजारो महिलांनी फुटबॉल  सामन्याचा स्टेडियमवर जाऊन आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. तेहरानच्या स्टेडियमवर गुरुवारी ३ हजार  महिलांनी इराणच्या फुटबॉल संघाचा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. फीफा विश्व चषकाच्या पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत इराणने कंबोडिया संघाला १४-० अशी मात दिली. 

जडेजा नर्व्हस नाईंटीजचा शिकार, पण...

बीबीसीच्या वृत्तानुसार, महिलांसाठी स्टेडियममध्ये विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या मैदानात एकूण ७८ हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. सामना पाहण्याची परवानगी मिळाल्याचा आनंद मैदानात आपल्या संघाला प्रोत्साहन देणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर सहज दिसून येत होता. एका महिलने ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांचा ७१ वर्षांपूर्वीचा विक्रमही टाकला मागे

तिने लिहिलंय की, आम्ही तीन तास सामन्याचा आनंद घेतला. आमच्यातील काहींनी आनंद अश्रू देखील अनावर झाल्याचा उल्लेखही या महिलेने केला आहे. आम्ही आमच्या आयुष्यात असा अनुभव खूप उशीराने अनुभवला. नव्या पीढीला याचा फायदा होईल याचा आनंद आहे. फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेटिंनो म्हणाले की 'हे एक सकारात्मक पाऊल आहे. याचा फिफा आणि इराणमधील युवा मुलींना फायदा होईल. इराणमधील महिला आणि तरुणी या क्षणाची खूप दिवसांपासून प्रतिक्षा करत होत्या.