पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माहीच्या निवृत्तीवर सनी पाजींचा 'स्टेटड्राइव्ह'

महेंद्रसिंह धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवर अनेक दिग्गज क्रिकेटर्संनी आपली मते मांडली आहेत. यात आता लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या स्ट्रोकची भर पडली आहे. भारतीय संघाने आता धोनीशिवाय विचार करायला हवा, असे रोकठोक मत गावसकर यांनी मांडले आहे.  

लोकेश राहुल अडचणीत, हे दोन खेळाडू उभे करु शकतात आव्हान

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील गावसकर म्हणाले की, धोनीने थांबण्याची वेळ आली आहे. भारतीय संघाने आता धोनीशिवाय संघ बांधणीचा विचार करायला पाहिजे. बीसीसीआयकडून दबाव निर्माण होण्यापूर्वीच धोनी सन्मानपूर्वक निवृत्तीची घोषणा करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

INDvSA T20 : कोहलीनं रागानं स्टम्प तोडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

२०१४ मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळाले. विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापासून धोनी क्रिकेटच्या मैदानात दिसलेला नाही. भारतीय संघाची विंडीज दौऱ्यासाठी घोषणा झाली त्यावेळी धोनीने स्वत: दौऱ्यातून माघार घेतली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यातही धोनी ऐवजी ऋषभ पंतला पसंती देण्यात आली आहे.