पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून संतप्त गिब्जनं पाक चाहत्यांची तुलना जनावरांशी केली होती

हर्षल गिब्ज

दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हर्षल गिब्जने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातील  निलंबनाविषयी आश्चर्यचकित करुन टाकणारा खुलासा केलाय. २००७ मध्ये सेंच्युरियनच्या मैदानात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये रंगलेल्या सामन्यावेळी पाकिस्तानी चाहत्याला अपशब्द वापरल्याच्या कारणावरुन गिब्जवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. तब्बल १३ वर्षांनी गिब्जने यावर भाष्य केले आहे.  

...म्हणून सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियात रोहनसोबत कोर्टवर उतरणार नाही

पाकिस्तानी चाहत्याविरोधात केलेले वक्तव्य स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर आयसीसीने त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. गिब्जने नुकताच ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना गिब्ज म्हणाला की, काही पाक चाहत्यांची तुलना मी जनावरांशी केली होती. त्यांनी प्लेयर बॉक्ससमोरील आसनावर बसलेल्या माझ्या मुलासह पत्नीला त्यांनी आसन सोडून जाण्यास भाग पाडले होते.  

धोनीच्या निवृत्तीवर सेहवागची फटकेबाजी

गिब्सने दक्षिण अफ्रीकेकडून ९० कसोटी आणि२४८ एकदिवसीय सामने खेळले असून कसोटीत ६ हजार १६७ तर एकदिवसीयमध्ये त्याच्या नावे ८ हजार ९४ धावा जमा आहेत. एकदिवसीय सामन्यात सहा चेंडूत सहा षटकार खेचण्याचा विक्रम हा गिब्जच्या नावे आहे.  २००७ च्या विश्वचषकात गिब्जने नॅदरलँडविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Herschelle Gibbs Reveals Calling Pakistan Supporters Animals Led Him To 2-Test Ban In 2007