पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेटला भ्रष्टाचारमुक्त करा, रायडूचा अझरुद्दीनवर पलटवार

अंबाती रायडू आणि मोहम्मद अझरुद्दिन

हैदराबाद क्रिकेटमधील अंतर्गत वादाच्या मुद्यावर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन आणि अंबाती रायडू यांच्यातील वाद चव्हाट्यावर येत आहे. हैदराबाद क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर रायडूने ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला होता. तेलंगणा प्राधिकरण मंत्र्यांनी याबाबतीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी रायडूने केली होती. 

नेतृत्वाच्या कर्तृत्वाचा 'विराट' विक्रम, धोनीला टाकले मागे

रायडूने उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अझरुद्दीन यांनी त्याला हताश क्रिकेट म्हटले होते. यापूर्वी विश्वचषकावेळी संघात स्थान न मिळाल्याने त्याने बीसीसीआयच्या निवड समितीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला होता. ट्विटच्या माध्यमातून त्याने नाराजी व्यक्त केली होती.  रायडूने हैदराबात क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत कामकाजामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाष्य केले आहे.

INDvsBAN : टीम इंडियाचा विश्वविक्रमी चौकार

त्याने अझरुद्दीन यांना टॅग करत एक ट्विट केले आहे. यात त्याने लिहिलंय की, "हे प्रकरण आपल्या दोघांतील वैयक्तिक वाद आहे असे समजू  नका. हैदराबाद क्रिकेमध्ये काय सुरु आहे याची तुम्हाला आणि मलाही चांगली कल्पना आहे. इश्वराच्या कृपेनं तुम्हाला हैदराबाद क्रिकेटला भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्याची संधी मिळाली आहे. तुम्हाला विनंती करतो की, पिढीच्या उज्वल भविष्यासाठी याकडे लक्ष द्या"