पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहित-रितिकाच्या 'त्या' फोटोमुळे हेजल युवीवर रागावली

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माने पत्नी रितिका सहदेह हिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने दिलेल्या कॅप्शनवर युवीची पत्नी हेजलने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या भावनेवर नेटकऱ्यांनी युवीला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.  

स्मिथने डॉन ब्रॅडमनला टाकले मागे, कसोटीत सर्वांत वेगवान ७००० धावा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Better than what was I before, more than what I’m today, is by holding that 🖐 😁 @ritssajdeh

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

भारत आणि बांगलादेश यांच्या कसोटी मालिका संपल्यानंतर संघातील खेळाडूंनी विंडीज दौऱ्यापूर्वी आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवत आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्याविरुद्धच्या मालिकेपूर्वी रोहितने आपल्या पत्नीसोबत काही वेळ घालवला. रोहितने रितिकासोबतचा एक फोटो शेअर केलाय. यात रोहित पत्नीचा हात हातामध्ये घेऊन चालताना दिसत आहे. मी पहिल्यापेक्षा उत्तम आहे. रितिकाच्या या सहवासातून आणखी उत्तम होईन, अशा आशयाच्या कॅप्शनसह त्याने हा फोटो शेअर केलाय. यावर रितिकाने 'Aaawwww babyyyyyyy' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

U19 World Cup 2020 : टीम इंडियाची घोषणा, प्रियमकडे नेतृत्वाची धूरा

हेजल कीचने यावर केलेल्या प्रतिक्रियेनंतर क्रिकेट चाहते युवीला ट्रोल करत आहेत. हेजलने कमेंटमध्ये लिहलंय की युवराज माझ्यासाठी कधीतरी अशी पोस्ट शेअर कर. माझ्यासोबत लग्न करुन तीस वर्षे झाल्यासारखा नको वागतो आहेस, असाही उल्लेख हेजलने केला आहे. तिच्या या कमेंटवर क्रिकेट चाहते युवीची कारकिर्दी संपली असून रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय, अशा प्रतिक्रिया उमटल्या. युवी भाईवर एवढा राग व्यक्त करुन नका. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा अजूनही खेळतोय. अशा काही प्रतिक्रिया उमटत आहेत.  

hazel keech s comment

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:hazel keech trolled yuvraj singh on rohit sharma s instagram post on his wife ritika sajdeh