पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगात भारी ठरलेले कुस्तीपटू राजकीय आखाड्यात चीतपट

बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकालही समोर आले. कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत भारताचे नाव जगभरात पोहचवाऱ्या दोन कुस्तीपटूंना राजकारणाच्या मैदानात पराभवाला सामोरे जावे लागले. ऑलिम्पिक विजेता योगेश्वर दत्त आणि महिला कुस्तीपटू बबिता फोगट भाजपच्या तिकीटावर हरियाणातील निवडुकीच्या आखाड्यात उतरले होते.

बर्थडे बॉय मिथुनची हॅट्ट्रिक, शाहरुखचीही शिकार 

आपल्या डावपेचानं प्रतिस्पर्ध्याला चारिमुंड्या चित करुन लोकप्रियेतेच्या शिखरावर पोहचलेल्या या खेळाडूंना जनतेने आमदारकीसाठी कौल दिला नाही. दुसरीकडे भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंह यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. भाजप उमेदवार योगेश्वर दत्त याला काँग्रेस उमेदवाराने तर बबिता फोगटला अपक्ष उमेदवाराने पराभवाचा धक्का दिला. हॉकीपटू संदीप सिंह यांनी देखील भाजपच्या तिकीटावरच निवडणूक लढली होती. त्यांनी काँग्रेसच्या मनदीप सिंह यांना ४२ हजार ५३३ मतांनी पराभूत केले.

यूरोपीय लीग : युवा एम्बापेनं मोडला मेस्सीचा विक्रम

योगेश्वर दत्तने ३६ हजार ४४ मते मिळवली मात्र त्याला जवळपास ५ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.  बबिताला २४ हजार ५०४ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिली. विशेष म्हणजे दोन्ही कुस्तीपटूंनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी हरियाणा पोलीसातील नोकरीला रामराम केले होते.